*जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जनसेवा सहकारी बँक, चाकण शाखेच्या पुढाकाराने शाखा परिसरात “वृक्षारोपणाचा कार्यक्रम” घेण्यात आला.*

आज, बुधवार , दिनांक ५ जून २०२४ रोजी दुपारी १२ वाजता “जागतिक पर्यावरण दिनाचे” औचित्य साधून जनसेवा सहकारी बँक, चाकण शाखेच्या पुढाकाराने शाखा परिसरात “वृक्षारोपणाचा कार्यक्रम” घेण्यात आला.
चाकण शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री.उदय कुलकर्णी, अधिकारी श्री. प्रसाद पेशवे तसेच उपस्थित अन्य मान्यवरांनी, सध्याच्या काळातील “ग्लोबल वॉर्मिगचा” वाढता धोका व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेता, पर्यावरण रक्षणाचे महत्व आणि उपाय याबाबत माहिती देण्यात आली

पर्यावरणाचे दिनाचे औचित्य साधून प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित मान्यवरांना बँकेच्या वतीने शाखेचे मान्यवर खातेदार श्री.विशाल बिरदवडे व श्री. अभिमन्यू धाडगे व श्री. राजूशेठ कड यांचे शुभहस्ते विविध रोपे देऊन स्वागत करण्यात आले.

परिसरात प्रत्यक्ष वृक्ष लावून तसेच महिलांच्या हस्ते देखील वृक्षरोपण करण्यात आले.

या प्रसंगी ग्लोबल कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे सर्वेसर्वा श्री. राजूशेठ कड, शाखेच्या इमारतीमध्ये असणाऱ्या श्रीसमर्थ स्कूल व कॉलेज चे संचालक श्री. शिवाजी गवारी सर, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. विद्याताई गवारी मॅडम, मुख्याध्यापिका सौ. पवार मॅडम, ACME सेफ्टीवेअर्स लिमिटेडचे श्री. गुप्ता साहेब, श्री. पाटील साहेब, सौ.देशपांडे मॅडम, PDCC बँक, खराबवाडी शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. वाडेकर साहेब, विकास अधिकारी श्री. राहुल वाघमारे साहेब, श्रीसमर्थ पतसंस्थेचे श्री. प्रज्वल लेंडघर साहेब, श्री एंटरप्रायजेस चे श्री. शुभम मुंगसे इत्यादी मान्यवर तसेच शाळेतील पाल्यांचे अनेक पालक आणि वरील विविध संस्थांचे कर्मचारी, अधिकारी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

श्री. गुप्ता साहेब यांनी ओघवत्या शैलीत वृक्षारौपण व वृक्षसंवर्धनाचे अनन्य साधारण महत्व विषद करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले व सर्वांनी कार्यक्रमाचे कौतुक करून वृक्षसंवर्धनाचे कार्य करण्याचे ठरवले.