श्री समर्थ पतसंस्थेच्या सहाव्या चऱ्होली बुद्रुक शाखेचा उद्घाटन पार पडले.

दि ०२ जुन : श्री समर्थ पतसंस्थेच्या सहाव्या चऱ्होली बुद्रुक शाखेचे उद्घाटन रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर नितीनआप्पा काळजे यांच्या हस्ते पार पडले. चऱ्होली बुद्रुक आणि पंचक्रोशीतील सभासद ठेवीदार हितचिंतक यांना सेवा मिळावी याकरिता श्री समर्थ पतसंस्थेमार्फत चऱ्होली बुद्रुक शाखा सुरू करण्यात आली आहे. या आधी पतसंस्थेच्या एकूण पाच शाखा व 170 कोटी व्यवसाय आहे, जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत पतसंस्थेची सेवा व त्या मार्फत कर्जवाटप व ठेव संकलन करण्याच्या उद्देशाने संस्थेची विविध शाखा सुरू करण्यात आल्या आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवाजीराव गवारे यांनी दिली.या कार्यक्रमावेळी संस्थेचे संस्थापक आधारस्तंभ संभाजीशेठ गवारे, उपाध्यक्षा सुरेखाताई गवारे, खजिनदार संतोषशेठ गवारे, श्री समर्थ ग्रुपच्या सचिव विद्याताई गवारे, त्याचप्रमाणे इतर सर्व शाखांचे संचालक सल्लागार मंडळ उपस्थित होते. संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले, त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांमधून चऱ्होली शाखेस सदिच्छा शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संस्थेच्या विविध शाखांच्या संचालक सल्लागार मंडळाचे नेमणूक करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सीईओ अमोल गवारे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार शाखा व्यवस्थापक अर्जुन जाधव यांनी मानले.