*श्री समर्थ ची यशाची परंपरा कायम*

कुरुळी ता.२७ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने( एस. एस. सी.बोर्ड) मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता.२७) जाहीर झाला असून चिंबळी फाटा येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयाने यावर्षीही निकालाची परंपरा कायम राखली आहे.विद्यालयाचा यंदाचा १०वी चा सेमीचा निकाल १००% आणि इंग्लिश मेडीयमचा निकाल 99.41% लागला असल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्या सौ. अनिता टिळेकर यांनी दिली. श्री समर्थ माध्यमिक विद्यालय चिंबळी फाटा या केंद्रातून सन २०२३-२४ साठी एकूण २५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.पैकी २५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विद्यालयाचा शाखा निहाय एकूण निकाल
सेमी माध्यम – 100% *
इंग्लिश मेडीयम -99.41%
निकाल लागला आहे.
शाखा निहाय गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे आहे.
सेमी मेडीयम
प्रथम क्रमांक – हर्षिता राहुल बेनके 95.80%
द्वितीय क्रमांक- सिद्धार्थ दत्तात्रय गायकवाड 90.80%
तर तृतीय क्रमांक प्रणाली कैलास सपकाळ- 88.00%
जय सदाशिव जाधव – 88.80%

इंग्लिश मेडीयम
प्रथम क्रमांक – उल्का शशिकांत पाटील 94.40%
द्वितीय क्रमांक-वरद नवनाथ करांडे 94.20%
तृतीय क्रमांक गौरी गिरीश फडकर -93.80%
चतुर्थ क्रमांक – स्नेहा चंद्रकांत काळे – 93.20%

याप्रमाणे निहाय निकाल लागला असून सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव गवारे सर तसेच संस्थेच्या सचिव सौ. विद्याताई गवारे मॅडम व प्राचार्या सौ. अनिता टिळेकर मॅडम यांनी अभिनंदन केले आहे .त्यांना मार्गदर्शन करणारे सौ.मोनाली मुंगसे, सपना टाकळकर, शुभांगी भोंगे,निखिल कांबळे, रूपाली पवळे ,तांबे शोभा,रुपाली सपकाळ , दिपाली थोरात,सिद्धेश धोंडगे यांनी मार्गदर्शन केले. विध्यार्थ्यांना शिकवणाऱ्या बडदे ललिता, अनाप मंगल, दिघे वर्षा, पटले वैशाली,रूपाली नाकट,कोमल शिंदे, पूजा पगारे,रेणुका होन,रूपाली पोटे, अवंतिका पोटे, राधा सोंडगे, लांडगे सर, ऋतुजा मोरे, गोविंद सर तसेच श्री समर्थ बस संघटना व श्री समर्थ पतसंस्था यांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

सेमी विभाग श्रेणी निहाय विद्यार्थी

विशेष प्राविण्य 22
प्रथम श्रेणी. 28
द्वितीय श्रेणी 17
तृतीय श्रेणी. 02

इंग्लिश विभाग श्रेणी निहाय विद्यार्थी

विशेष प्राविण्य 72
प्रथम श्रेणी. 76
द्वितीय श्रेणी 23
तृतीय श्रेणी. 00