*श्री समर्थ पतसंस्था सोळु शाखेचा 02 रा वर्धापन दिन उत्साहात साजरा*

श्री समर्थ पतसंस्था शाखा सोळुचा 02 रा वर्धापन दिन दिनांक ०१ मे २०२४ रोजी उत्साहात पार पडला. वर्धापन दिनानिमित्त शाखेत श्री सत्नारायण महापुजा आयोजित केली होती, सदर पुजेचा मान संस्थेचे संचालक चंद्रकांत पठारे, विकास गुंड व किरण ठाकुर या दाम्पत्यास देण्यास आला होता.यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. शिवाजीराव गवारे यांनी उपस्थित सभासद, खातेदार हितचिंतक यांना मार्गदर्शन केले व स्वागत करुन संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली, संस्थेने 02 वर्षांत 10 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला असुन चालु आर्थिक वर्षात 20 कोटी व्यवसाय करायचा आहे अशी माहिती अध्यक्षांनी दिली. वर्धापन दिनानिमित्त आलेल्या खातेदारांचे संस्थेचे संचालक संतोष तापकीर, भानुदास गोडसे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे सल्लागार विठ्ठल ठाकुर, ज्ञानेश्वर ठाकुर, राजाभाऊ सस्ते, अर्जुन जाधव, प्रदीप लांडगे, बाळासाहेब ठाकुर, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सभापती रामदास ठाकुर, TJSB बँक व्यवस्थापक विनोद बनकर, अक्षय भोसले, प्रशांत गावडे, प्रशांत राणे, पद्माकर कदम, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक श्री अमोल गवारे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्री संतोष साकोरे यांनी मानले.