*श्री समर्थ इंटरनॅशनल स्कूल अँड कॉलेज(CBSE) च्या इमारतीचे दिमाखात उदघाटन*

चाकण ता.२३- श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ मोई ,संचलित श्री समर्थ इंटरनॅशनल स्कूल(CBSE), महाळुंगे इंगळे.या नवीन शाखेच्या वास्तूचे उदघाटन नुकतेच पार पडले.या कार्यक्रम प्रसंगी खेड तालुक्यातील राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महाळूंगे व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना जवळच उत्तम व दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था व्हावी या साठी सर्व भौतिक सुख-सुविधांनी युक्त अशा शैक्षणिक संकुलाची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री.शिवाजीराव सुमनताई बबनराव गवारी यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर सुजाण व संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो असे मत या वेळी संस्थेच्या सचिव मा. सौ.विद्याताई शिवाजीराव गवारी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खेड बाजार समितीचे सभापती मा. श्री. कैलासशेठ लिंभोरे,जिल्हा परिषद सदस्य मा. श्री.बाबाजीशेठ काळे,श्री.चंद्रकांत दादा इंगवले,श्री.गणेशशेठ बोत्रे,श्री.रणजीतजी गाडे,श्री.चंदनदादा मुऱ्हे,श्री.नितीन फलके,श्री.तुकाराम नथुजी गवारे,श्री.संभाजी शेठ गवारे,सर्जेराव आप्पा गवारे,आप्पासाहेब गवारे,सुधीरशेठ मुऱ्हे,नितीन करपे,उमेशशेठ येळवंडे,ज्ञानेश्वर कुऱ्हाडे,संतोष गवारे,सोमनाथ गवारे,दिगंबर ठोंबरे,प्रकाश लिंभोरे, संतोशशेठ गवारे,संतोषशेठ बनकर,रोहिदासशेठ गवारे,गिरीषशेठ येळवंडे,हनुमंत कातोरे,सादिक गवारे,किरण गवारे,कैलास पडवळ,हिरामण आबा येळवंडे,शितलताई येळवंडे गोरक्ष बोत्रे,इंदिराजी माध्य.विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ तोत्रे सर,अमोल गवारी प्राचार्या सौ.अनिता टिळेकर,सौ.रुषा भोसले,सौ.विद्या पवार,सौ.पल्लवी कुटे, सौ.हसीना मण्यार सौ.रुपालीताई पवळे, सौ.सुनीताताई नाटक सौ.अश्विनी देवकर सर्व शाखांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , श्री समर्थ ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी,पालक व विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नवनाथ मेदनकर यांनी केले.