*निर्मिती मुन्हेने पटकाविले कांस्यपदक*

चिंबळी, दि. १२ – ऑलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कुरुळी (मुन्हेवस्ती) येथील जोग महाराज व्यायाम शाळेतील पै. निर्मिती नारायण मुहे हिने पिंपरी- चिंचवड संघाकडून खेळून कांस्यपदक पटकविले आहे. क्रीडा युवा संचनालय महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या वतीने उदगीर (लातूर) येथे या स्पर्धा पार पडल्या होत्या. यात निर्मितीने कांस्यपदक पटकविल्याने बाजार समितीचे संचालक सागर मुन्हे, माजी संचालक पांडुरंग बनकर, उपसरपंच दीपक डोंगरे, दीपक मुऱ्हे, विशाल सोनवणे, गुलाब सोनवणे, मारूती मुन्हे, नितीन गायकवाड, रामनाथ सोनवणे, नाना जैद आदींनी अभिनंद केले आहे.