*मोई मध्ये एक गाव एक शिवजयंती उत्साहात साजरी*

मोई. दि. 21 सालाबाद प्रमाणे या ही वर्षी मोई ग्रामस्थांच्या सहकार्याने एक गाव एक शिवजयंती उत्साहात साजरी झाली. सकाळी शिवजन्मभुमी किल्ले शिवनेरी येथुन शिवज्योत आणण्यात आली, ग्रामस्थांनी तिचे पुजण केले, सायंकाळी गावातून शिवरायांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात, गावातील लहान मुलांकरीता ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, यामध्ये बऱ्याच मुलांनी सहभाग घेतला, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, मासाहेब जिजाऊ अशा वेशभुषा मुलांनी केल्या होत्या. एक गाव एक शिवजयंती सलग 05 वर्ष नियमित आयोजित करण्यात येत असून गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, सदस्य, ग्रामस्थ यांचे बहुमोल सहकार्य होते, कार्यक्रमास महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे नियोजन समस्थ ग्रामस्थ मोई यांच्या वतीने करण्यात आले होते.