श्री समर्थ पतसंस्थेस बँको ब्लु रिबन पुरस्कार 2023 प्रदान

चिंबळी : सहकार क्षेत्राला बळकटी मिळावी या उद्देशाने अविज पब्लिकेशन, कोल्हापूर आणि गॅलेक्सी इन्मा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेली दहा वर्षे पतसंस्थांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. याच कामाचा एक भाग म्हणून प्रामाणिक आणि चोख काम बजावणाऱ्या, सरकारी कायदे आणि नियमांची चौकट सांभाळून प्रगती साधणाऱ्या पतसंस्थांचा हुरूप वाढवण्यासाठी बँको पतसंस्था सहकार परिषद आणि बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन हा संयुक्त कार्यक्रम राबवून राज्यातील उत्कृष्ठ पतसंस्थांना दरवर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सदर पुरस्काराचे वितरण दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी द डेल्टीन रिसॉर्ट, दमण येथे करण्यात आले होते. यावेळी श्री समर्थ पतसंस्थेस मा. सहकार आयुक्त, मधुकरराव चौधरी यांचे हस्ते ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था विभाग : ठेवी 60 ते 70 कोटी या विभागाचा बँको ब्लु रिबन पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारतेवेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव गवारे, आधारस्तंभ संभाजीशेठ गवारे, खजिनदार संतोषशेठ गवारे, संचालक सुधिरशेठ मु-हे, उमेशशेठ येळवंडे, संतोषशेठ बनकर, सल्लागार बाबुराव गवारे, ज्ञानेश्वर ठाकुर, गिरीशशेठ येळवंडे, सीईओ श्री अमोल गवारे, शाखा व्यवस्थापक श्री अर्जुन जाधव, श्री संतोष साकोरे, दिगंबर मु-हे, राहुल मु-हे, पांडुरंग गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.