श्री समर्थ विद्यालयाचा शासकीय रेखा कला परीक्षेचा निकाल शंभर टक्के

कुरुळी दि.१३ – श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज चा शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षा- 2024 चा निकाल 100% लागला असून यात A ग्रेड -01, B ग्रेड-04 व C ग्रेड – 18 या प्रमाणे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच एलिमेंटरी परीक्षेचा निकाल 98% लागला असून यात A ग्रेड -11, B ग्रेड-23 व C ग्रेड-48 विद्यार्थ्यांनी ग्रेड प्राप्त केली आहे. श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.शिवाजीराव गवारे सर,सचिव मा.सौ.विद्याताई शिवाजीराव गवारे मॅडम,इंदिराजी माध्यमिक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक मा.श्री.संतोष जोशी सर,कालाध्यापक मंडळाचे सचिव मा.श्री.पांडुरंग नेवसे सर यांच्या प्रयत्नातून या वर्षी विद्यालयास उपकेंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. श्री समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल,इंदिराजी माध्यमिक विद्यालय मोई,आनंद इंग्लिश मिडीयम स्कूल कुरुळी,D.V.J.इंटरनॅशनल स्कूल चिंबळी या विद्यालयातील एकूण 278 विद्यार्थी या परीक्षा केंद्रातून प्रविष्ट झाले होते.परीक्षेचे नियोजन श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज च्या प्राचार्या मा.सौ.अनिता टिळेकर मॅम,सुपरवायझर सौ.मोनाली मुंगसे,सुपरवायझर सौ.नंदिनी साकोरे, सौ.सपना टाकळकर(HOD),कॉर्डिनेटर सौ.शुभांगी बोंडे ,सौ.दीपाली थोरात(HOD) यांनी केले.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व चित्रकला मार्गदर्शक श्री.श्रीहरी पांचाळ,कु.आसावरी वैद्य यांचे श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने तसेच संस्थापक अध्यक्ष, सचिव,प्राचार्या, सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यालयातील शिक्षक सौ.रुपाली सपकाळ,सौ.मीनाक्षी पाटील,श्री. सुरज सोमवंशी,सौ. भाग्यश्री हिरमुखे, सौ. प्रियंका येळवंडे, सौ.अनिता खडसे,श्री. कृष्णकांत कांबळे, श्री.निखिल कांबळे,श्री.प्रशांत तांबे, श्री.सिद्धेश धोंडगे,जुई राऊत,दीप्ती लोखंडे या शिक्षकांनी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.