* श्री समर्थच्या राधिका पवारला किक बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक *

चिंबळी फाटा. १४ छत्रपती संभाजीनगर येथे भारत सरकार व Sports Authority of India यांनी आयोजित केलेल्या खेलो इंडिया किकबॉक्सिंग ह्या स्पर्धेत श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजची विद्यार्थिनी कु.राधिका संदीप पवार हिने कांस्य पदक मिळवत आपल्या राज्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली व त्याचप्रमाणे दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तिची निवड झाली. यामध्ये या स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे व सचिव सौ विद्याताई गवारे यांनी तिचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी स्कूलचे क्रिडा जयेश कसबे सर व प्राचार्या सौ अनिता टिळेकर मॅडम यांनी मार्गदर्शन व तयारी करून घेतली.