*राजमाता जिजाऊ जयंती,स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवक दिन उत्साहात साजरी*

दि – १२ जानेवारी २०२४ रोजी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज नाणेकरवाडी येथे राजमाता जिजाऊ जयंती , स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवक दिन उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी अनिकेत शेळके सर ( संयोजक, पुणे ग्रामीण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ) , शिवदास सूर्यवंशी ( जिल्हा विस्तारक ),प्रथमेश शिंदे (रा .स्व ,संघ महाविद्यालय चाकण शहर प्रमुख ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . अनिकेत शेळके यांनी मुलांना मार्गदर्शन करताना ” उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होई पर्यंत थांबु नका ” हा स्वामी विवेकानंद यांचा मंत्र सांगताच उपस्थितांनी विद्यार्थिनी काही मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला.

एकविसाव्या शतकातील जिजाऊंनी आपल्या शिवाजीला समाजप्रबोधनाचे धडे द्यावेत, तसेच राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवबाचा आदर्श घ्यावा, आजच्या युगात महिलांनी आपल्या मुलींना कसे राहावे हे शिकविण्यापेक्षा आपल्या मुलाने कसे आचरण करावे, हे शिकविण्याची गरज निर्माण झाली आहे, असे सांगितले.असे प्रतिपादन अनिकेत शेळके यांनी केले .या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी बबनराव गवारे सर , संस्थापिका सचिव विद्याताई गवारे मॅडम , शाळेच्या प्राचार्या सौ विद्या पवार मॅडम, शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ अश्विनी देवकर मॅडम , पर्यवेक्षक सौ बोरकर मॅडम , सौ पडवळ मॅडम , सौ मणियार मॅडम , सौ रेश्मा पवार मॅडम , श्री समिर गवारे सर , श्री अमित पवळे सर ,श्री आबा गवारे सर , श्री कुलकर्णी सर ,उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पोटे मॅडम आणि प्रास्ताविक सौ पोखरकर मॅडम यांनी केले , तसेच आभार प्रदर्श श्री सागर गाडे सर यांनी केले