*श्री समर्थ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ( नाणेकरवाडी )*

आज महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्र पोलीस वाहतूक विभाग ( महाळुंगे पोलिस स्टेशन) यांच्या वतीने मार्गदर्शन पर शिबिर आयोजित केले होते. या वेळी मा श्री नामदेव वाघमोडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांचा समवेत निकेश गिरसे , मनोहर मेश्राम हेही उपस्थित होते. केवळ घातक पदार्थांचे सेवन च नाही तर समाज मध्यामे , ऑनलाईन गेम अशा व्यसनाच्या आहारी नवीन पिढी जाताना दिसत आहे ही दुर्दैवाची बाब आहे. विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्ये जबाबदारीची जाणिव करुन देणे गरजेचे आहे. त्यांना उत्तम शिस्त लागावी, त्यांच्या मनावर मुल्यांचे संस्कार रुजविले जावेत, त्यांचा पाया भक्कम व्हावा याकरीता त्यांनी शालेय जिवनात चांगल्या सवयी अंगिकारणे काळाची गरज असते. जिवनात सकारात्मक दृष्टीकोण बाळगा. बुध्दीवान व सामर्थ्यशाली युवा पिढीवर देशाचे उज्वल भवितव्य घडविण्याची मुख्य जबाबदारी असते.

वाहतुकीचे शिस्त पाळावी , तसेच सायबर सेक्युरिटी याबाबतही मार्गदर्शन केले आहे. आई वडीलांचे कष्ट त्याग व समपर्णाची जाणिव ठेवा असेही वाघमोडे सर यांनी सांगितलं .या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री शिवाजीराव बबनराव गवारे सर , संस्थापिका सचिव मा सौ विद्याताई शिवाजीराव गवारे मॅडम , शाळेच्या प्राचार्या सौ विद्या पवार मॅडम, शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ अश्विनी देवकर मॅडम , पर्यवेक्षक सौ बोरकर मॅडम , सौ पडवळ मॅडम , सौ मणियार मॅडम , सौ रेश्मा पवार मॅडम , श्री कुलकर्णी सर , समीर गवारे सर , उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ पोखरकर मॅडम यांनी केले.