*श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज’ च्या विद्यार्थ्यांचे विभागस्तरीय ‘किक- बॉक्सिंग’ स्पर्धेत यश*

चाकण :दि.२७- जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व सोलापूर जिल्हा किक-बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय शालेय किक-बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा काल सोलापूर या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये खराबवाडी(नाणेकरवाडी),चाकण येथील श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.१)कु.सोहम शिंदे इ.१०वी (सिल्व्हर मेडल),
२)कु.राजलक्ष्मी गुळवे इ.१२वी (सिल्व्हर मेडल)
३)कु.साई मांढरे इ.१०वी (ब्रॉन्झ मेडल) ४)कु.श्वेता नागफासे इ.१२वी (ब्रॉन्झ मेडल) या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचे नेतृत्व करत पदके पटकावली आहेत. या विद्यार्थ्यांना शासनाच्या क्रीडा विभागाकडून प्रशस्तीपत्र व खेळाचे वाढीव गुण दिले जाणार आहेत.मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री.जयेश कसबे सर,श्री.प्रज्वल दाभाडे सर, प्रशांत तांबे सर,सौ.श्रुतिका आनंदकर मॅडम व गुणवंत खेळाडू यांचे श्री समर्थ शिक्षण प्र. मंडळाचे अध्यक्ष मा. श्री.शिवाजीराव गवारे,सचिव मा.सौ.विद्याताई शिवाजीराव गवारे,प्राचार्या मा.सौ.अनिता टिळेकर,प्राचार्या मा.सौ.विद्या पवार मॅडम,पर्यवेक्षिका मा.सौ.अश्विनी देवकर मॅडम सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.