*गिलबिले सर यांना साने गुरुजी शिक्षकरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान*

दि. २४ डिसेंबर २०२३ पूज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त कळंब, ता.आंबेगाव, पुणे येथे साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने साने गुरुजी शिक्षकरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार श्री मधुकर गिलबिले सर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी साने गुरुजी कथामाला महाराष्ट्र अध्यक्ष श्री श्यामराव कराळे गुरुजी, जिल्हा अध्यक्ष श्री बाळासाहेब कानडे, सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते, तसेच प्रमुख पाहुणे प्रा. माधव वझे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्यामची आई चित्रपट बालकलाकार, साधना मासिक संपादक श्री विनोद शिरसाठ, जुन्नर गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे मॅडम, केंद्रप्रमुख कल्पना टाकळकर मॅडम यांसह खेड, आंबेगाव, जुन्नर, पारनेर, मुळशी, शिरूर, दौंड, पुणे शहर येथील शिक्षक बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय हुतात्मा बाबु गेनु युवा प्रतिष्ठान अध्यक्ष बाबाजी चासकर उपस्थित होते. श्री समर्थ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे व सचिव सौ विद्याताई गवारे यांना सरांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.