*श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज व श्री समर्थ पत्संस्थेमध्ये ‘अक्षता कलशाचे’ भक्ती भावाने स्वागत*

कुरुळी ता. २१- चिंबळी फाटा येथील श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज च्या विदयार्थी व श्री समर्थ पतसंस्थेचे कर्मचारी यांनी श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथून आलेल्या ‘अक्षता कलशाचे’ मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत केले.अक्षता कलशाचे पूजन श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.शिवाजीराव गवारे सर,संस्थेच्या सचिव मा.सौ.विद्याताई गवारे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी सल्लागार मा.श्री.शेखरजी करपे सर, मा.श्री.विलासजी गायकवाड सर, श्री समर्थ पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी,मा. श्री .अमोल गवारे सर,प्राचार्या मा.सौ.अनिता टिळेकर मॅडम,संचालिका मा. सौ. रुपालिताई पवळे,चंदा पवार मॅम ,चिंबळी गावचे ग्रामस्थ,सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ढोल,ताशा झान्झ,लेझीम च्या गजरात पालखी मधून प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची व अक्षता कलशाची भव्य मिरवणूक काढली,या वेळी विद्यार्थ्यांनी प्रभू श्री राम, लक्ष्मण,सीतामाई यांची वेशभूषा केली होती.मुलांनी परिधान केलेला पांढरा सदरा, नऊ वारी साडी, जय श्री राम च्या घोषणा,महिला शिक्षिका,विद्यार्थिनींनी घातलेली फुगडी हे सर्व डोळ्यांची पारणे फेडणारे होते.कार्यक्रमाचे आयोजन श्री समर्थ ग्रुप ने केले होते तर नियोजन विद्यालयातील सांस्कृतिक विभागाने केले होते.