*श्री समर्थ ग्रुप च्या वतीने खास ‘शिवनेरी दर्शन’ सहलीचे आयोजन*

कुरुळी ता. ३० – ‘श्री समर्थ ग्रुप’आयोजित ‘भव्य किल्ले बनवा स्पर्धेचे’ आयोजन रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. श्री समर्थ ग्रुप मधील श्री समर्थ पतसंस्था, श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज, श्री समर्थ असोसिएट,श्री समर्थ वाचनालय व श्री समर्थ बस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिवाळीच्या कालावधीत किल्ले बनवा स्पर्धा घेतली जाते. यंदाचे हे आठवे वर्ष असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना दरवर्षी श्री समर्थ ग्रुप तर्फे शिवजन्मभूमी असलेल्या ‘किल्ले शिवनेरी’ चे मोफत दर्शन घडवून आणले जाते. श्री समर्थ ग्रुपच्या या उपक्रमास सोळु, धानोरे, चिंबळी, खालूंब्रे, खराबवाडी, चाकण, निघोजे, मोई, मोशी, कुरुळी, म्हाळुंगे, आळंदी, केळगाव, डुडुळगाव, गावातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून यावर्षी सुमारे दीड हजार विद्यार्थी विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवून सहलीत सहभागी झाले होते, त्यातील एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना किल्ले शिवनेरी मोफत सहलीस नेण्यात आले होते.
श्री समर्थ ग्रुप चे संस्थापक/अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव गवारे सर, सचिव मा.सौ. विद्याताई गवारे मॅडम यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून या सामाजिक उपक्रमास थोरा-मोठ्यांकडून शुभेच्छा रुपी आशीर्वाद मिळत आहेत.
ही स्पर्धा यशस्वी करण्यास श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज व श्री समर्थ पतसंस्थेच्या चिंबळी फाटा,खराबवाडी,निघोजे,खालुम्ब्रे,केळगाव,चाकण,हडपसर या ब्रँचच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.