*श्री समर्थ ग्रुपतर्फे सहभागी स्पर्धकांना २६ नोव्हेंबर रोजी मोफत किल्ले शिवनेरी सहल*

चिंबळी : श्री समर्थ ग्रुप चिंबळी फाटा (पतसंस्था, स्कूल, कॉलेज, असोसिएट, वाचनालय) आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धा (वर्ष ८ वे) श्री समर्थ ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजोमय इतिहास सांगणा-या किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना किल्ले शिवनेरी येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी मोफत सहलीला नेण्यात येणार आहे,

यासाठी श्री समर्थ स्कूल बस संघटनेच्या वतीने २५ बसचे नियोजन केले असुन तालुक्यातील विविध भागांमधून सकाळी ०७.३० वाजता बस निघणार आहेत. तरी सहभागी विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घ्यावा. स्पर्धेतील विजेत्यांना किल्ले शिवनेरी येथे क्रमांक काढून सन्मानीत करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे व सचिव सौ विद्याताई गवारे यांचे कल्पनेतून या स्पर्धेस सलग ०८ वर्ष पुर्ण झाली.