*कै. सौ. बायडाबाई दिगंबर गवारी यांचे अस्थिविसर्जन शेतात करत निर्माण केला नवीन आदर्श*

मोई (ता. खेड) येथील शेतकरी कुटुंबातील मातोश्री बायडाबाई दिगंबर गवारी यांचे निधन झाले, त्यांच्या कुटुंबातील वारकरी मंडळाचे सदस्य तुकाराम गवारी यांनी त्यांच्या अस्थी नदीपात्रात विसर्जित न करता शेतात विसर्जित केल्या आणि त्यावर फळझाडांचे वृक्षारोपण केले.

बायडाबाई यांचे पती, मुले, मुलगी, दिर, पुतणे, नातवंडे व सर्व पाहुणे परिवार यांनी नदीपात्रातील पाणी दूषित होऊ नये म्हणून झाडांसाठी अस्थी खत रूपात वापरण्याचा निर्णय घेतला होता. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अनुराग जैद यांच्या संकल्पनेनुसार हे वृक्षारोपण करीत बायडाबाई यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या स्मृती जागृत ठेवल्या. या वेळी जैद म्हणाले, गवारी परिवाराने निसर्ग प्रेमापोटी आपल्या मातोश्रींच्या अस्थी विसर्जित न करता फळझाडे लावून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

परिसरातील विविध गावांतील नागरिकांनी या कृतीचा अवलंब केला पाहिजे. याप्रसंगी दिलीप राऊत, सुरेखा फुगे, रेखा माताळे, हेमचंद्र हरगुडे, माऊली कुटे, दत्ताशेठ येळवंडे, बाबूराव माताळे, दिगंबर गवारी, संभाजी गवारी, माजी सरपंच पल्लवी गवारी, संतोष गवारी, स्वप्नील गवारी, सचिन गवारी, सादिक गवारी, सचिन फलके, अभिषेक जैद, राजू गवारी आदी उपस्थित होते.