‘कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र’ तर्फे श्री समर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

कुरुळी दि.२८ :- चिंबळी फाटा येथील श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज मध्ये आज सोमवार दि.2८/८/२०२३ रोजी विद्यालयातील इ.८वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना १०-१२ वी नंतर असणाऱ्या रोजगाराच्या विविध संधी या विषयावर मा.श्री.संजय तांबोळकर सर (सह-केंद्रप्रमुख, ‘स्व-रूपवर्धिनी’ कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र) यांनी मार्गदर्शन केले.
‘स्व’-रूपवर्धिनी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, चऱ्होली व श्री समर्थ स्कूल व कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या हॉल मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इ.१०-१२वी नंतर विद्यार्थ्यांना लवकर जॉब मिळवून देणारे अल्प कालावधीचे विविध कोर्सेस,त्या साठी आवश्यक असणारी पात्रता,कागदपत्रे,या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या वेळी श्री समर्थ शि. प्र.मंडळाचे अध्यक्ष मा.श्री .शिवाजीराव गवारे सर,सचिव मा.सौ.विद्याताई गवारे मॅडम,प्राचार्या मा.सौ.अनिता टिळेकर मॅडम,मा.सौ.शुभांगी भोंडे मॅडम, सर्व शिक्षक,विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील सांस्कृतिक विभागाने केले होते.सूत्रसंचालन सह.शिक्षक सुरज सोमवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी कु.पूर्वा गवारे हिने केले.