श्री समर्थ व्याख्यानमालेत मा.श्री .वसंत हंकारे सरांचे प्रमुख मार्गदर्शन

श्री समर्थ ग्रुप’ आयोजित ‘श्री समर्थ व्याख्यानमालेत’ सुप्रसिद्ध व्याख्याते व प्रबोधनकार मा.श्री.वसंत हंकारे सर यांनी आज प्रथम पुष्प माळले. श्री समर्थ ग्रुप चे सर्वेसर्वा मा.श्री. शिवाजीराव गवारे सर सचिव सौ.विद्याताई गवारे मॅडम यांच्या संकल्पनेतून श्री समर्थ व्याख्यानमाला हा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. दुर्लक्षित केला गेलेला विषय म्हणजे ‘बाप’. ‘बाप समजून घेताना’ या विषयावर आपले विचार मांडताना हंकारे सरांनी खळखळून हसवता हसवता नकळत श्रोत्यांच्या डोळ्यांची किनार ओली केली.जगात आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे आपले आई-वडीलच असतात असे सांगत आपल्याकडून आपल्या आई वडिलांची मान खाली जाईल असे कृत्य होणार नाही यासाठी मुला-मुलींनी काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी फक्त गुणवंत होऊन चालणार नाही तर त्यांनी संस्कारक्षम होणे अपेक्षित आहे असे त्यांनी या वेळी नमूद केले.
कार्यक्रम प्रसंगी श्री समर्थ पतसंस्थेचे संचालक मा.श्री.सुधीरशेठ मुर्हे, श्री उमेशशेठ येळवंडे, श्री. भानुदास गोडसे, श्री. ज्ञानेश्वर ठाकूर संचालिका मा.सौ.नंदाताई येळवंडे, प्राचार्या सौ.अनिता टिळेकर,पतसंस्थेचे सीईओ श्री.अमोल गवारे, सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार श्री.गणेश फलके, उद्योजक श्री.अजित मेदनकर, उद्योजक श्री.हेमंत काळडोके, सा. कार्यकर्ते श्री.विलासजी गायकवाड सर ,सर्व पतसंस्थेचे कर्मचारी,सर्व विद्यार्थी पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.