मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष मा. श्री.डॉ. संदीप सांगळे सर यांची श्री समर्थ विद्यालयास सदिच्छा भेट

कुरुळी दि.११ – चिंबळी फाटा येथील श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास मराठी अभ्यास मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.श्री.डॉ.संदीप सांगळे सर यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी या गावचे सुपुत्र व सध्या तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख व प्राध्यापक या पदावर मागील २३ वर्षापासून ते कार्यरत आहेत.प्राध्यापक डॉ. सांगळे यांची नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांच्या निवडीबद्दल ‘श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे’ अध्यक्ष मा.श्री.शिवाजीराव गवारे सर सचिव मा.सौ.विद्याताई गवारे मॅडम, प्राचार्या मा.सौ. अनिता टिळेकर मॅडम, रुपालिताई पवळे, सपना टाकळकर ,शोभा तांबे,मोनाली मुंगसे,शुभांगी भोंडे , अजित थोरात , सुरज सोमवंशी,निखिल कांबळे ,दिपाली थोरात, सिद्धेश्वर धोंडगे व सर्व शिक्षक यांनी डॉ. सांगळे सर यांचे अभिनंदन केले. उपस्थिती दरम्यान त्यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. विद्यापीठ अभ्यास मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल प्रा.डॉ.सांगळे सर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.