Talathi Bharti 2023 – महाराष्ट्र महसूल व वन विभाग मध्ये ४६४४ जागांसाठी “तलाठी” पदांची मेगा भरती २०२३-२४.

राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात 23 June रोजी शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३, सकाळी ११:५५ पासून सुरु झालेली आहेत. तसेच १७ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख आहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख द्वारे प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे.या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.