रोज चार पानं तरी वाचायला हवीतच

वाचन हा आपल्या दैनंदिन वा आयुष्याचा भाग असला पाहिजे, असं आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो. ही सवय लहान वयापासूनच आपल्याला असेल तर मोठेपणी आपल्याला त्याचा फायदा होतो. वाचनाने माणून समृद्ध तर होतोच; पण त्यामुळे त्याच्या भाषेवर, विचारांवर, मनावर चांगले संस्कारही होत असतात. लहान मुलांना आपण ज्याप्रमाणे इतर चांगल्या सवयी लावतो त्याचप्रमाणे वाचनाची सवयही लहान वयापासूनच लावली तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. पालकांनीही मुलांसोबत एकत्रित वाचन करायला हवे. वाचनाचे इतरही कसे फायदे होतात याविषयी बालमानसतज्ज्ञ प्रीती काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, त्या कोणत्या पाहू या…

रोज न चुकता मुलांसोबत २० ते २५ मिनिटे काही ना काही वाचायला हवे. यामध्ये आपण मुलांच्या आवडीचे कोणतेही पुस्तक घेऊ शकतो. सध्या बाजारात रंगबेरंगी चित्र असलेली असंख्य पुस्तके उपलब्ध असतात. वाचनामुळे मुलांचे संवादकौशल्य आणि भाषा सुधारते. हे तर ठीकच आहे; पण वाचनामुळे मुलांचा तुमच्यासोबत असणारा कनेक्ट स्ट्रॉंग व्हायला मदत होते. पालक म्हणून आपला मुलांशी.

मुलांशी काय बोलावं किंवा त्यांच्यासोबत वेळ कसा घालवावा असा प्रश्न अनेक पालकांना असतो. अशावेळी शाळेत काय केलं असा कॉमन प्रश्न विचारला जातो. मात्र, या प्रश्नाचे उत्तर पालकांना मिळतेच असे नाही. त्यामुळे तुम्ही वाचन करत असाल तर त्याच्या रेफरन्सनी मुलांशी संवाद साधणे सोपे जाते. पुस्तक वाचत असताना आपण त्यातील पात्रांबाबत आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो.

दुसऱ्या दिवशी वाचनावर गप्पा

दुसऱ्या दिवशी किंवा नंतर कधीही आपण पुस्तकातील संदर्भ देऊन मुलांशी संवाद साधू शकतो. असे केल्याने मुलं आपल्याशी पटकन आणि अधिक चांगल्या पद्धतीने कनेक्ट होतात. यामुळे आपले मुलांशी असणारे नाते अधिक दृढ होण्यास मदत होते. शिवाय मुलांना वाचलेले पवके लक्षात राहण्यासाठीही मदत होते ही सवय फायद्याची ठरते.