शिक्षण पद्धतीत हवेत कालानुरूप बदल

देवेंद्र फडणवीस : एनईपी धोरण कालसुसंगत

पुणे: विसाव्या शतकात लोकांसमोरचे प्रश्न वेगळे होते. अन्याय, लोकांचा आवाज दाबला जाणे, त्यांच्यावर कुणीतरी राज्य करणे अशी स्थिती असायची. एकविसाव्या शतकात आपण लोकशाही स्वीकारली. यात कायद्याव्यतिरिक्त कोणतीही बंधने नाहीत. यापुढील काळात नव्या पिढीसमोर कालसुसंगत राहण्याचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. तंत्रज्ञान वेगाने प्रगती करीत आहे. त्यात जर कालानुरूप बदल केला नाही तर शिक्षण पद्धत कालबाह्य व निरुपयोगी ठरेल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ‘लर्न, अनलर्न, रीलर्न’ अशी त्रिसूत्री स्वीकारल्याशिवाय भविष्यातील आव्हानांचा सामना करता येणार नाही. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उन्नत ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृहाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे तसेच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सचिव शामकांत देशमुख, सहकार्यवाह सुरेश तोडकर, जोत्स्ना एकबोटे व मॉर्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र गंजारत शास्थित होते.

फडणवीस म्हणाले, आपण १९८३ मध्ये शैक्षणिक धोरण स्वीकारले. मात्र. त्यात थेट २०२० मध्ये बदल केले. पण आता असे करून चालणार नाही. कारण २०२५, २०३५ ची आव्हाने वेगळी आहेत. भविष्यातील आव्हाने ओळखून नव्या तंत्रज्ञानात्मक मूल्यांचा विचार करून हे नवे शैक्षणिक धोरण तयार केले आहे. ते विस्तार, सर्वसमावेशक आणि उत्तमता या त्रिसूत्रीवर आधारित असून, त्यासोबत रोजगारक्षमता हा मुद्दा त्यात समाविष्ट आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने शिक्षणासह सर्व क्षेत्रात मोठी क्रांती केल्याने होणाऱ्या बदलांना स्वीकारून त्यासाठीचे मनुष्यबळ शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करावे लागेल, असेही ते म्हणाले. प्रास्ताविकात डॉ. गजानन एकबोटे यांनी विद्यापीठ आम्हाला दरवर्षी दोनच कोर्स शिकविण्याची परवानगी देते. कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतर धोरण थोडेफार बदलले. महाविद्यालयांना स्वायत्तता दिली, पण पायातल्या बेड्या कमी कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेंद्र झुंझारराव यांनी आभार मानले..!

विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला द्यावी चालना

पुणे: विद्यापीठे ही आव्हाने स्वीकारणारी, त्यावरील उपाय शोधणारी आणि नवकल्पना समोर आणणारी नव सृजन केंद्रे भादेत युनि-२०१ -२०’ परिषदेतील चर्चेच्या माध्यमातून जगातील विद्यापीठे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देऊन जगातील समस्यांवर उपाय शोधण्यास सहाय्यभूत ठरतील, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लवक कॅम्पस येथे स येथे आयोजित २० परिषदेच्या युनि-२ या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जागतिक बँकेच्या प्रतिनिधी डॉ. निना अरनॉल्ड, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे डॉ. पंक न मित्तल, सिम्बायोसिसचे संस्थापक, कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी उपस्थित होते. डॉ. माशेलकर म्हणाले, ‘शिक्षण क्षेत्रात सर्वसमावेशकता, नावीन्यता, एकत्रीकरण या तीन बाबी महत्त्वाच्या आहेत.’