संभाजी अवघडे यांना शरदचंद्र पवार ग्रंथ मित्र पुरस्कार

 

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग महाराष्ट्र राज्य च्या वतीने अमळनेर येथे राज्य स्तरीय शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये
आ शरदचंद्र पवार साहेब ग्रंथ मित्र पुरस्कार गाव तेथे ग्रंथालय चळवळ तील उत्कृष्ट ग्रंथालय न्ना प्रदान करण्यात आले. यामध्ये आमदार दिलीप राव मोहिते पाटील सार्व वाचनालय व ग्रंथालय चिंबळी खेड चे अध्यक्ष संभाजी धोंडीबा अवघडे यांना शरदचंद्र पवार ग्रंथ मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी पक्षाचे अध्यक्ष,खासदार शरद पवार ,प्रदेशध्यक्ष जयंत पाटील,विरोधी पक्षनेते अजित पवार,एकनाथ खडसे, अमळनेरचे आमदार अनिल पाटील,ग्रंथालय विभागचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील ,समन्वयक रीताताई बाविस्कर,सचिव प्रशांत लोंढे, प्रदेश महिला सचिव विमलताई ठाकूर आणि खेड राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागचे अध्यक्ष बाबासाहेब ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळ :- शरदचंद्र पवार ग्रंथमित्र पुरस्कार खासदार शरद पवार यांच्या हस्ते स्वीकारताना संभाजी अवघडे.