श्री समर्थ विद्यालयात ‘शिवराज्याभिषेक दिन’ उत्साहात साजरा.

कुरुळी दि.06/06/2023 श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज चिंबळी फाटा, येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘राज्याभिषेक सोहळा‘ उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल ताशाच्या गजरात व भव्य मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष
मा. श्री.शिवाजीराव गवारे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.शेखर कृष्णाजी करपे सर( चाकण तालुका रा. स्वयं.संघ कार्यवाहक) संस्थेच्या सचिव मा.सौ.विद्याताई गवारे मॅडम व विद्यालयाच्या प्राचार्या मा. सौ. अनिता टिळेकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मा.श्री. शिवाजी मामा खराबी सर (अनंत कृपा पतसंस्था, संचालक व रा. स्व. संघ, संघ प्रमुख चाकण तालुका) यांनी महाराजांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणांमधून भावी पिढीने आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचे मार्गदर्शन केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषा करून शिव गीते ,नृत्य, नाटक ,पोवाडे व भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली पोटे मॅडम व पूजा मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शालेय सांस्कृतिक विभाग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.