श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज, चिंबळी फाटा विद्यालयातील विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

कुरुळी दि.2 जून 2023 :-चिंबळी फाटा येथील श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज चा इयत्ता दहावीचा निकाल या वर्षीही उत्कृष्ट लागला असून विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली असल्याची माहिती श्री समर्थ शि.प्र. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. शिवाजीराव गवारे सर यांनी दिली. मार्च 2023 एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत विद्यालयातील सेमी माध्यमाचा निकाल 97.36% व इंग्रजी माध्यमाचा निकाल 95.91% लागला असून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे श्री समर्थ शि.प्र.मंडळाच्या सचिव मा.सौ.विद्याताई शिवाजीराव गवारे मॅडम, श्री समर्थ पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी मा.श्री. अमोल गवारे सर, विद्यालयाच्या प्राचार्या मा.सौ.अनीता टिळेकर मॅडम, शाळेच्या पर्यवेक्षिका मोनाली मुंगसे मॅडम,शोभा तांबे मॅडम, सपना टाकळकर मॅडम,शुभांगी भोंडे मॅडम तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
माध्यम निहाय निकाल पुढीलप्रमाणे :-

सेमी माध्यम
प्रथम क्रमांक- कु.योगिता घेगडे 90.20%
व्दितीय क्रमांक – कु.प्रेम शितोळे 89.40%
तृतीय क्रमांक – कु. प्रिया पाटील 88.40%

इंग्रजी माध्यम
प्रथम क्रमांक – कु.रिद्धी सिंग 89.00%
व्दितीय क्रमांक: – कु.सोनिया शर्मा 87.80%
तृतीय क्रमांक – कु.प्रांजल गाडे 86.00%

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वर्गशिक्षिका ललिता बडदे मॅडम, स्नेहल विधाते मॅडम,सुनेत्रा खलोकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच या विद्यार्थ्यांना घडविण्यात मंगल अनाप मॅडम, वर्षा दिघे मॅडम,सोनाली कानडे मॅडम, वैशाली पटले मॅडम, रूपाली नाकट मॅडम,रूपाली सपकाळ मॅडम,अजित थोरात सर, निखील कांबळे सर,राधा सोंडगे मॅडम,ऋतुजा मोरे मॅडम , दीपाली थोरात, सिद्धेश्वर धोंडगे व सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.