श्रीमंत गायकवाड सरकार प्रतीष्ठान शाखा क्र.५ कुरुळी संचलीत गाव मौजे चिंबळी तालुका खेड येथे शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीराला पंचक्रोशीतील पालकांचा,मुलांचा रणरागिणींचा उदंड प्रतिसाद.

#मर्दानी_आखाडा :- शिबीराचा दुसरा दिवस सकाळचे सत्राचे वृत्तांकन
आज रविवारी सकाळी शिबीराचा दुसर्या दिवसाचे पहिले सत्र संपन्न झाले.एकुण शिबिरार्थी प्रवेश १९८ या उच्चांकी पातळीवर गेलेला आहे. त्यामुळे संघाच्या दुर्गा वाहीनी विभागाच्या पाच महिला प्रशीक्षिकांना व संघाचे तीन शिक्षक यांना आजचे संध्याकाळचे सत्रापासुन नेमणुक केली आहे. विद्यार्थ्यांना प्रात्तकाळी जाग येत नसलेने सकाळी उपस्थीती कमी जाणवली. टीव्ही 9 चॅनलचे पत्रकार मा.सुनिल थिगळे साहेब यांनी सहा मिनिटाचे वृत्तांकन चित्रीकरण करुन प्रसारणासाठी पुढे वरिष्ठ कार्यालयास पाठवले आहे. प्रमुख पाहुणे माननीय शिवप्रेमी,फिरंगोजी नरसाळा स्मारक समिती प्रतिष्ठानचे अद्यक्ष,संग्राम दुर्गाचे नुतनीकरणाचे शिल्पकार ॲडव्होकेट किरणजी झिंजुरके यांनी वर्गाला संबोधित केले. ते म्हणाले आजच्या आधुनिक काळात मुलींना स्वसंरक्षणासाठी अशा प्रशिक्षणाची नितांत गरज आहे.जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला ऊद्धरी या म्हणीफ्रमाणे अशा असंख्य राष्ट्रमाता जिजाऊ बनवण्याचे काम हे सर्वोच्च ईश्वरीय कार्य आहे. हे काम श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान शाखा क्रमांक ५ कुरुळी व ग्रामस्थ चिंबळी करत आहे. याबद्दल चिंबळीतील ग्राभस्थांचे कौतुक केले.ऐतिहासिक मल्लविद्या प्रेमी गाव व महाराष्ट्र केसरी पिता पुत्र असलेले हे गाव असलेने समृद्ध रुढी परंपरा जपणारी पिढीचा अभिमान वाटतो.असा वैभवशाली आदर्श जिल्ह्यातील ईतर स्वयंसेवी संस्थांनी घ्यावा अशी त्यांनी चिंबळीतील पद्मावती मातेच्या चरणी प्रार्थना केली.
तसेच जानेवारी२०२३ चे राष्ट्रीय कुस्ती सुवर्णपदक विजेती,कुरुळी गावची हिरकणी पै. तेजल अंकुशराव सोनवणे पाटील हिच्या उपस्थितीने मैदानात नाविन्यपूर्ण ऊर्जा निर्माण झाली होती. तेजल चे स्वप्न आहे मल्लविद्येचे ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून नाथसाहेबाचे चरणी अर्पण करुन भारत मातेच्या वैभवात मानाचा तुरा रोवायचा आहे. त्या आनंद प्रित्यर्थ तिरंग्याला मुजरा करायचा आहे. हे ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
पद्मावती मातेच्या प्रांगणात रणरागिणींचे प्रात्यक्षिक पाहुन उपस्थित पालकांचे डोळे दिपून गेले.
जय शिवराय जय शंभुराजे