विद्यार्थी व पालकांना भोरमध्ये हेल्मेट वाटप

भोर : राईट टू सेफ्टी उपक्रमांतर्गत पालकांच्या सुरक्षा बरोबर मुलांच्या सुरक्षेची खूपच गरज असून सेवा सारथी संस्था यांच्या वतीने भोर तालुक्यात नसरापुरला १०१६ तर भोलावडे येथे ७४४ अशी एकूण १६५० पालक व विद्यार्थ्यांना हेल्मेट मोफत वाटप करण्यात आले भोलावडे येथे इ २ री ते ७ वी च्या मुलांना व पालकांना दुचाकीवरून सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून सेवा सहयोगी फाउंडेशन, सेवा सारथी आयसीआयसीआय लोम्बार्ड व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने ७४४ हेल्मेट वाटप करण्यात आली. उदघाटन सरपंच प्रवीण जगदाळे यांच्या हस्ते झाले.

यावेळी सेवा सारथी संस्थेचे अध्यक्ष अमित तोडकर, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे उपसरपंच गणेश आवाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय अब्दागिरे, मंगेश आवाळे, संतोष पासलकर, नागेश्वर ओझरकर, ओंकार ठोंबरे, संजय कदम, कैलास जाधव मंगल खुटवड शिवाजी खोपडे, बाळू गायकवाड विजय खुटवड मुख्याध्यापक मनोज जगताप व बहुसंख्य पालक विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.