अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू; तीन जखमी किवळे रोडवरील घटना; आश्रयाला थांबणे बेतले जिवावर

पिंपरी वादळी वाऱ्यासह सुरू •असलेल्या पावसापासून संरक्षणासाठी किवळेतील कात्रज- देहुरोड सर्व्हिस रोडवरील एक पंक्चरच्या दुकानाच्या आडोशाला उभ्या राहिलेल्या आठजणांवर होर्डिंग पडून भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये पाचजणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि. १७) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील किंवळेजवळ घडला. होर्डिंग अनधिकृत असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

शोभा विनय टाक (६५, रा. पारसी रोड, देहूरोड), वर्षा विलास केदारे (५० वर्ष रा. गांधीनगर, देहूरोड), भारती नितीन मंचल (३३, रा. शीतला देवीनगर, मामुर्डी, देहूरोड), अनिता उमेश रॉय (४५, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड), रामअवध प्रल्हाद आत्मज (२९, मूळ गाव- महाराजगंज, उत्तर प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. तर विशाल शिवशंकर यादव (२०), रहमद मोहम्मद अन्सारी (२१, किवळे, पुणे), रिंकी दिलीप रॉय (४५. रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी जखमींची नावे आहेत.

सोमवारी (दि. १७) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवड परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. महामार्गाजवळील किवळेतील कात्रज- देहूरोड सर्व्हिस रोडवरून प्रवास करणारे काहीजण पावसापासून करण्यासाठी रस्त्याच्या बचाव कडेला असलेल्या एका टपरीजवळ उभे राहिले. मात्र, जोरदार वाऱ्याने होर्डिंग

वादळी वाऱ्यासह पावसामुळे कात्रज-देहुरोड सर्व्हिस रोडवर होडिंग कोसळले. यानंतर ते हटविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि सहा क्रेन घटनास्थळी दाखल झाले.