मोशी येथे श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम कथेचे आयोजन ह.भ.प. आनंदा बारणे यांच्या एकसष्ठीनिमित्त धार्मिक उपक्रम

श्रीरामनवमीनिमित्त तसेच ह.भ.प आनंदा बारणे यांच्या एकसष्ठी सोहळ्याच्या निमित्ताने बारणेवस्ती येथे १६ ते २२ एप्रिल रोजी दररोज सायंकाळी सात ते नऊ दरम्यान आयोजन केले आहे. रविवार (दि. १६). श्रीराम कथेस प्रारंभ झाला असून, ह. भ. प. समाधान महाराज शर्मा कथेचे निरूपन करत आहेत. भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे, जेष्ठ नागरिक, मोशी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात कथेच्या पहिल्या दिवशी उपस्थित होते.

कथेच्या पहिल्या दिवशी मोशी परिसराती नागरिकांनी कथा श्रवणासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. श्रीराम जय राम जय जय राम चा जप आणि प्रसन्नमय वातावरण रविवारी (दि.१६) पहायला मिळाले. दररोज कथा आलेल्या नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या युगात राम सापडणे कठीण

संपल्यानंतर

आहे पण रावण सर्वत्र दिसत आहे. अशा परिस्थितीत या आधुनिक युगात भगवान श्रीरामांची प्रासंगिकता अधिकच वाढते. श्रीराम कथा ही आपल्या संपूर्ण व्यथा दूर करते. चांगले संस्कार रुजविण्याचे

काम या कथेतून होतात. तसेच भक्ती- भाव आणि चांगल्या मार्गावर जाण्यासाठी प्रेरणा देते. यासाठी प्रत्येकाने श्रीराम कथेचे श्रवण करणे आवश्यक असल्यामुळे आणि वडीलांच्या एकसष्ठीनिमित्त या धार्मिक सहकार्य आहे.

कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी केले आहे. या सोहळ्यासाठी बारणे परीवार आणि मोशी ग्रामस्थांचे सहकार्य आहे.