तीस वर्षानंतर भरली शाळा

श्री नागेश्वर विद्यालय मोशी येथील 1992-93 ची दहावीच्या विद्यार्थ्यांनी तीस वर्षानंतर एकत्र येत खेड तालुक्यातील भामा नेचर रिसॉर्ट या ठिकाणी एक दिवसीय वर्ग भरवला. यावेळी मोशी ,चिंबळी ,मोई ,कुरुळी ,डुडुळगाव , माजगाव, चिखली या गावातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .सर्वांना वेलकम ड्रिंक देऊन हॉल बसण्यास सांगितले .यावेळी शाळेची घंटा वाजून राष्ट्रगीत प्रतिज्ञा आणि प्रार्थना झाली .यावेळी दिवंगत मित्र-मैत्रिणींना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विमल भुजबळ/ गोरे मॅडम यांच्यां हस्ते निसर्ग देवता म्हणजेच रोपट्याला पाणी घालुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी भुजबळ मॅडमनी मुलांना मार्गदर्शन केले .तदनंतर प्रत्येक मित्र-मैत्रिणींचा व्हिडिओ क्लिप द्वारे सहकुटुंब परिचय झाला. सर्वांची हजेरी घेऊन प्रत्येक मुलामुलीने आपल्या जीवनातील शाळेमध्ये घडलेली प्रसंग सांगून सर्वांना भारवून टाकले. सर्व विद्यार्थी तीस वर्षांपूर्वीच्या वर्गामध्ये रममान झाले होते .प्रत्येकाला वाटत होते 1992- 93 च्या काळातील घडलेल्या विविध घटनांचे चित्रण पुन्हा एकदा डोळ्यासमोर येऊन भूतकाळातील घटना ताज्यातावाने वाटू लागल्या .आणि पुन्हा तीच धमाल ,तीच मस्ती, तोच दंगा सुरू झाला .या कार्यक्रमाचे विशेष असं होतं या कार्यक्रमाला आमच्या मित्रांच्या पत्नी म्हणजेच वहिनी सुद्धा उपस्थित होत्या ,तसेच मैत्रिणींच्या कुटुंबातील सदस्य पती असतील, मुले असतील हे मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी सकाळी बारा ते अडीच वाजेपर्यंत पहिल्या सत्रामध्ये मित्र-मैत्रिणींनी विविध प्रसंग सांगून जुन्या आठवणींना नव्याने उजाळा दिला. खरं म्हणजे हे गेट-टुगेदर नसून आम्हाला सर्वांना जोडणारा स्नेहाचा बंध स्नेहमेळावा होता, दुपारच्या सत्रात स्वादिष्ट पंचपक्वानावर सर्वांनी ताव मारला आणि जेवण झाल्यानंतर कुल्फी खाल्ली. तर नंतर सर्वांनी या रिसॉर्टच्या बगीचात जाऊन फोटो काढण्याचा मनमुराद आनंद लुटला. सगळेजण एकमेकांना विचारत होते .तू सध्या काय करतोस? तू सध्या काय करतेस? तुझी मुलं काय करतात ?तुझे हे काय करतात ?कसा बरा आहेस ना तू? बरी आहेस ना? अशा अनेक गप्पा गोष्टी झाल्या. शाळेत घडलेल्या घटनांचा सगळा पाढा सगळ्यांनी वाचून दाखवला. कसे पाच वाजले कळले सुद्धा नाही. पुन्हा नव्याने एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणी मध्ये भावा बहिणी मध्ये ऋणानुबंध नव्याने प्रस्थापित झाले. सगळेजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते .मोशी पासून २९ किलोमीटर अंतरावर असलेल्या ह्या रिसॉर्टवर जाऊन सर्वांचा थकवाच मिटून गेला . भामाआसखेड धरणाच्या तीरावर असलेले रिसॉर्टच्या स्विमिंग टॅंक गार्डनच्या परिसरात मनमोराद फोटो काढले, सेल्फी काढले. निसर्गाचा आस्वाद घेतला आणि याच ठिकाणी या कार्यक्रमाचा समारोप झाला. या समारोपाच्या वेळेस सर्वांनी एक निश्चय केला आजपासून आपण आपल्या मित्रांच्या सुखदुःखात सहभागी होऊन एकमेकांना सहकार्य करायचं, समाजात असणाऱ्या गरजू गरीब लोकांना ,डोंगरी भागातील मुलांना शालेय साहित्याच्या माध्यमातून फुलना फुलाची पाकळी म्हणून मदत करायची .आज आपली वय 45 पेक्षा जास्त आहेत .उरलेल आयुष्य खूप आनंदाने जगायचं आणि दुसऱ्याला जगून द्यायचं .आलेला दिवस आनंदात घालवायचा .असं प्रत्येक जण मनाशी खुणगाठ बांधून या परिसरातून निघताना एक दृढ निश्चय करून निघत होता. यावेळी सर्व मित्र-मैत्रिणींचा एक छानसा फोटो काढण्यात आला .तो आज आनंदाचा क्षण प्रत्येकाने आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात मन मंदिराच्या गाभाऱ्यात अनंत काळासाठी ठेवला .या कार्यक्रमासाठी सर्व मित्र-मैत्रिणींनी तन-मन-धनाने हातभार लावला .या बॅचमधील बरेचसे विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या कार्यक्षेत्रात उज्वल यश संपादन करणारे आहेत. राजकीय क्षेत्रातील नगरसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य तर कोणी शिक्षक आहे, कोणी इंजिनियर, आहे कुणी बांधकाम व्यवसायिक आहे, कोणी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात पुढे आहे ,कोणी रिअल इस्टेट च्या माध्यमातून व्यवसाय करत आहे ,नोकरीच्या माध्यमातून सर्वांनी प्रगती साधलेली आहे , इतर सर्व व्यवसायात यशस्वी आहेत. याचा खूप खूप अभिमान आहे. ना भूतो ना भविष्य असा स्नेहमेळावा पार पडला, स्नेहमेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींनी सुंदर नियोजन केले होते. त्यामुळे हा आपला स्नेहाचा मेळावा सफल झाला.
यावेळी संतोष येळवंडे , नारायन करपे ,प्रविन कुदळे , मनिषा बहिरट, शांताराम घरदाळे ,योगेश बनकर ,संतोष कुदळे ,भानुदास होले, वैशाली बारवे , राजु जाधव , संतोष गवारे ,एकनाथ करपे,नितीन घाडगे ,सुनिल मंडलिक ,प्रतिक्षा गोगावले,सविता तळेकर , प्रकाश करपे, संतोष वहिले, मुक्ताराम वहिले , संतोष आल्हाट , जयश्री शेवकरी , सुजित सस्ते , संदिप शिंदे , प्रविन मुर्हे , नवनाथ करंजखेले ,विठ्ठल मेदनकर , संजय येळवंडे ,दत्तात्रेय हजारे , संदिप (संजय) सस्ते ,कुसुम खांडेभराड,चित्रा सोनवने , सरस्वती डोंगरे,रमांकात बहिरट , वंदन ताठे,सुनिता तळेकर,संतोष नरके ,शांताराम गायकवाड,माऊलि कड, योगिनी बनकर ,पद्मा बनकर ,शिंदे मनिषा ,गुलाब बोराटे ,महेंद्र जगनाडे ,यशवंत कुदळे ,दिपक आल्हाट ,छाया येळवंडे , मैना बागडे , सुनिल बनकर ,बनकर बाजीराव , नारायन गवारे , सविता नरके , बोराटे आदिनाथ ,संजय बाबसो वहिले ,सुनिल बोराटे ,संतोषबुवा बोर्हाडे ,दत्तात्रेय आल्हाट ,विक्रम सस्ते ,कालिदास खंडागळे ,सीमा खुर्पे ,तारामती कर्पे ,प्रकाश बागडे ,संभाजी शेलार ,आप्पासाहेब बहिरट ,अजित गवारे ,रायकर कैलास ,महादेव येळवंडे ,संतोष मेहता, लक्ष्मण बधाले ,मनिषा कोतवाल,शर्मिला सस्ते तापकिर ,संतोष गायकवाड ,श्रीकांत गायकवाड ,सस्ते गणेश ,राजेंद्र बनकर,रमेश बोराटे,अशोक जैद,प्रदिप तापकिर,शिळावणे विठ्ठल ,नवनाथ कुदळे,संजय रामाने ,भरत गायकवाड ,विजय बनकर ,संतोष नामदेव वहिले ,अविनाश आल्हाट ,तानाजी जैद ,कैलास साकोरे ,गिरीष कड ,अनिल टिळेकर ,अनिल कुटे ,संतोष जाधव ,संतोष आल्हाट,छाया येळवंडे,अशोक बुट्टे ,युवराज कोद्रे हे सर्व मित्र-मैत्रिणी यांच्या सहपरिवारासोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते.