मोई येथे ६ एप्रिल २०२३ रोजी भैरवनाथ महाराज उत्सव पारंपारिक पद्धतीने होणार संपन्न

मोई ता खेड येथील भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त मानाच्या गाड्याचे पूजन करत शेकडो वर्षाची परंपरा जोपासली आणि हनुमान जयंती च्या दिवशी या मनाच्या गड्याला ओढून उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त मोई गावातील भाविक या ९ दिवस उपवास,भजन,आरती,पूजन व गाड्यास जलाभिषेक करतात. दि ६ एप्रिल रोजी पारंपरिक वाद्याच्या गजरात भैरवनाथ महाराजांची पालखी इंद्रायणी नदीला स्नानाला जात असते सायंकाळी बारागडे ओढण्याची परंपरा व उपस्थित उत्सवाची सांगता होत असते