इंदिराजी विद्यालय मोईत २८ वर्षांनी भरला माजी विद्यार्थी स्नेह मेळावा .

चाकण : मोई येथील इंदिराजी विद्यालयातील सन १९९७ सालच्या इयत्ता दहावीच्या माजी – विद्यार्थ्यांचा स्नेह – मेळावा ‘ , हॉटेल बर्ड व्हॅली येथे संपन्न झाला . विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .नवनाथ तोत्रे, ज्येष्ठ शिक्षक श्री संतोष जोशी , श्री सुनील घुमटकर , श्री प्रवीण शिंदे ,जिल्हा परिषद शाळेचे माजी – शिक्षक श्री . क्षीरसागर सर , सौ. शिंदे मॅडम यांचा यावेळी सन्मान सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे वेळी मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक श्री नवनाथ तोत्रे म्हणाले – ‘विद्यार्थ्यांची मुले आता आमचे विद्यार्थी झाले आहे . ‘ आपले विद्यार्थी यशाच्या उंच शिखरावर पोहोचले आहे , हे पाहून समाधान वाटते . श्री क्षीरसागर सर म्हणाले, ‘ मोई गावाने खूप प्रेम दिले .आदर दिला . ‘ श्री सुनील घुमटकर सर म्हणाले, ‘ स्वच्छंदी व आरोग्यपूर्ण आयुष्य जगा . ‘ श्री प्रवीण शिंदे सरांना जुने प्रसंग सांगताना कंठ दाटून आला होता . आजच्या विद्यार्थ्यांकडून असे प्रेम मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रम घडवून आणण्यासाठी श्री पांडाभाऊ फलके, श्री सोमनाथ करपे, श्री शिवाजी गवारे ,संतोष गवारे, सोमनाथ गवारे, तानाजी फलके . योगेश फलके ,गोरक्षनाथ फलके, बाजीराव गवारे ,आनंदा फलके ,अनिल गवारे, नवनाथ फलके,संभाजी येळवंडे , जीवण करपे,रवी येळवंडे,जगन्नाथ गारगोटे,सुरेखा गवारे, अशोक गवारे,संगीता कुटे , बायडा गवारे,नंदा गवारे,साधना हरगुडे ,सारिका रोकडे ,चारुशीला टेकळे,भामा भालेकर,शकुंतला फलके, I शशिकला कर्पे , दत्ता फलके यांनी खूप मेहनत घेतली
गोरक्षनाथ फलके , चंद्रकांत गवारे यांनी आभार मानले तर सूत्रसंचलन श्री सागर पवार यांनी केले