श्री समर्थ पतसंस्था,चिंबळी फाटा व्यवसायात झाली भरघोस वाढ

३१ मार्च रोजी पतसंस्थेकडे ६० कोटी ९६ लाख इतक्या ठेवी असून, पतसंस्थेने रु. ४७ कोटी ८० लाख इतका कर्ज पुरवठा केला आहे. भागभांडवल रु 03 कोटी ३6 लाख असून स्वनिधी रु.०३ कोटी ३७ लाख,गुंतवणूक 17 कोटी ३९ लाख व खेळते भांडवल ६९ कोटी ३० लाख आहेत. पतसंस्थेकडे एकूण ३५ कर्मचारी कार्यरत आहे.

पतसंस्थेने सोनेतारण, वैयक्तिक कर्ज,व्यवसाय/ गृहबांधणी तरणी कर्ज,वाहनतारण कर्जे अल्प व्याजदराने. दिली जातात. पतसंस्थेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या ग्राहकांना कार्यक्षम सेवा दिल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानात बँकेने आवश्यक एवढी गुंतवणूक केली असल्याचे मा.शिवाजीराव गवारे यांनी सांगितले.