भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात केंद्रीय मंडळाने अल्प वाढ

या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात केंद्रीय मंडळाने अल्प वाढ करून तो ८. १५ टक्के केला आहे. केंद्रीय मंडळाने मंजूर केलेला हा ठराव नंतर अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. अर्थ मंत्रालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रत्यक्ष व्याजदर अमलात येईल.२०२१-२२ या या आर्थिक वर्षासाठी ठेवीवरील व्याजदर कमी करून केवळ ८.१०% करण्यात आले होते. त्या अगोदरच्या वर्षात हा व्याजदर ८.५% होता. आता निधीचे सध्याचे व्याजदर चार दशकाच्या नीचांकी पातळीवर आहेत. यापूर्वी १९७७ मध्ये निधीवरील व्याजदर केवळ आठ टक्के इतका होता. केंद्रीय मंडळाच्या या निर्णयाकडे भविष्य निर्वाह निधीचे पाच कोटी सदस्य लक्ष देऊन असतात. दरम्यानच्या काळामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने आपला रेपो दर वाढविला आहे. त्यानंतर बँकांनी विविध कर्जावरील व्याजदर वाढविले आहेत. त्यामुळे यावर्षी भविष्य निर्वाह निधीने व्याज दरात वाढ केली आहे.