श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज निघोजे येथील विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यश संपादन

शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी युनिक स्नॅच असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या कराटे स्पर्धेत श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज च्या 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी 15 सुवर्णपदक व 11 रौप्य पदक मिळवले. विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव बबनराव गवारे सर व संस्थेच्या संस्थापिका सौ विद्याताई गवारे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. तसेच शाळेच्या प्राचार्या पल्लवी कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक व श्री जयेश कसबे सर ,श्री सचिन जगताप सर व श्री गणेश गायकवाड सर यांनी कठीण परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी तयार केले.
सुवर्णपदक मिळवलेले विद्यार्थी
आशुतोष बोडके ,राजवर्धन तरंगे ,अन्वर खान ,सिमरन लोणी, श्रेयस पुंड,संदीप तोरसल्ले, अनुष्का येळवंडे, साधना सोनजी, पृथ्वीराज गायकवाड, पियुष चौधरी ,सुप्रिया जंबुकर ,अतिका मलिक ,फरहान मलिक, सुमित तिवारी, साई मांढरे.
रौप्यपदक मिळवलेले विद्यार्थी
शार्दुल कड, कार्तिक शिंदे ,यज्ञेश शेवाळे, हर्षल बेंडाले,रूपम कामत, विराज फडके, अपर्णा येळवंडे, निधी चऱ्हाटे, स्वरांजली येळवंडे, नितेश यादव
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन.