श्री समर्थ स्कूल चाकण येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.

श्री समर्थ स्कूल चाकण
दिनांक ८ मार्च २०२३ रोजी श्री समर्थ स्कूल चाकण येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.
महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात महिला पालकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या.
या कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संगीत खुर्ची उखाणे असे अनेक खेळ घेण्यात आले.दैनंदिन व्यापातून वेळ काढून महिलांनी विविध स्पर्धांचा मनसोक्त आनंद लुटला.
संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे, सचिव सौ.विद्याताई गवारे मुख्याध्यापक सौ. स्वाती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महिला मेळावा भरवण्यात आला, हा मेळावा विद्यार्थी, शिक्षक वृंद आणि पालकांच्या उपस्थितीत आनंदात व उत्साहात संपन्न झाला.