श्री. समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल , खालुंब्रे येथे महिला दिनाचा सोहळा उत्साहात संप्पन्न

दि. ९मार्च २०२३, रोजी महिला दिनाचे औचीत्त्य साधून श्री. समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल , खालुंब्रे येथे महिला दिनाचा सोहळा उत्साहात संप्पन्न झाला. यावेळी सौ दिपाताई नानेकर (सामाजिक कार्यकर्त्या), माया ठाकूर, डॉ. पल्लवी. सुप्रियाताई बोत्रे ( संचालिका श्री समर्थ पतसंस्था)..सौ. वंदना यादव ( मुख्याध्यापिका) खालुंब्रे ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महिलापालक आणि विध्यार्थी आवर्जून उपस्थित होते. यावेळी अनेक वेगळया गेम्स घेण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिपालीताई यांनी स्वीकारले. तसेच स्पर्धेत विजयी झालेल्या महिलांना दिपाताई यांनी बक्षीस वितरण केले. व माया ठाकूर यांनी महिलांच्या नाश्त्याची छान व्यवस्था केली. यावेळी सौ. विद्या गवारे मॅडम (सचिव, श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज) या आवरजून उपस्थित राहिल्या व सर्व महिलांना स्पर्धेसाठी प्रोत्साहित केले..तसेच कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन निलम मॅडम यांनी केले. तसेच उपस्थित असलेले सर्व महिला पालक, शिक्षक,कर्मचारी यांचे *सौ वंदना यादव मॅडम (मुख्याध्यापिका श्री समर्थ स्कूल खालुंब्रे) आभार व्यक्त केले..!