श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज मध्ये मराठी राज भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

विविध भाषा बोलल्या जाणाऱ्या भारत देशामध्ये आपण महाराष्ट्र या राज्यात राहतो आणि महाराष्ट्र या राज्याची मातृभाषा मराठी आहे आणि प्रत्येकालाच या मराठी भाषेचा गर्व आहे. म्हटले जाते “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी” या मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी सोमवार दि.27 फेब्रुवारी 2023 रोजी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज मध्ये मराठी राजभाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक श्री.शिवाजीराव गवारे सर तसेच संस्थेच्या अध्यक्षा व संस्थापिका सौ. विद्याताई गवारे मॅडम तसेच प्राचार्य सौ.टिळेकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखालील इयत्ता नर्सरी ते बारावी च्या विद्यार्थ्यानी यात सहभाग घेतला, प्रथम सरस्वती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली गेली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवी मधील आर्या आणि राजलक्ष्मी हिने केले. लहान मुलांनी त्यांच्या गोड भाषेत मराठी कविता सादर केल्या तर काहीच मुलांनी यावर आपल्या मराठी भाषणातून कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनावर थोडक्यात माहिती सांगितली .तसेच काही मुलांनी पोवाडे, अभंग ,कथा ,गीत ,या माध्यमातून मराठी भाषा दिवसाचे महत्त्व सांगितले तसेच इयत्ता सहावी मधील ज्ञानेश्वरी हिने संगीत पेटीवर अभंगवाणी सादर केली.
काही विद्यार्थ्यांनी विविध संतांची वेशभूषा धारण करून त्यांच्या कार्याची जाणीव करून दिली.आपल्या मराठी भाषेला किती महत्त्व आहे हे आपल्या कृतीतून सादर केले. तसेच शाळेतील शिक्षिका पगारे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व समजावून सांगितले. कार्यक्रमावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका शोभा तांबे मॅडम, मोनाली मुंगसे मॅडम, सपना टाकळकर मॅडम, दिपाली थोरात मॅडम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविली. शेवटी मनीषा नवले मॅडम यांनी सगळ्यांचे आभार मानले.