श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज निघोजे येथे विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले.

मंगळवार दि.28 फेब्रुवारी 2023 रोजी भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये 90% मुलांनी भाग घेतला होता . विज्ञान प्रदर्शनामध्ये वायु प्रदूषण , सौर सिंचन प्रणाली , ज्वालामुखीचा उद्रेक यासारखे विषय मांडून विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयार केले होते. विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य आत्मसात व्हावी यासाठी आत्तापासूनच त्यांच्यामध्ये वृत्ती निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या प्राचार्य पल्लवी कुटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षकांनी कठीण परिश्रम घेऊन शाळेच्या प्रांगणामध्ये विज्ञान प्रदर्शन भरवले होते.
तसेच SLC (Students Lead conference) मध्ये टीचर डेमोस्ट्रेशन घेण्यात आले. यावेळी पालकांनी वर्गात बसून शिक्षक मुलांना कशा पद्धतीने अध्यापन करतात हे निरीक्षण केले, पालकांना पडलेले प्रश्न सोडवण्यात आले . प्रदर्शनात आलेले पालक खुश होते यावेळी शाळेच्या शिक्षिकाही तेथे उपस्थित होत्या.