नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता मोहिमेत 27.28 मेट्रीक टन कचरा संकलन करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालय आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता मोहिमेत 27.28 मेट्रीक टन कचरा संकलन करण्यात आला.

स्पाईन रोडच्या दुतर्फा व पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी येथील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते भोसरी पांजरपोळ या रस्त्यावर आयोजित स्वच्छता मोहिमेत सुमारे 1100 स्वयंसेवक व महापालिका अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या नियंत्रणाखाली शहर स्वच्छ व सुंदर करण्याचे प्रयत्न करण्यात येत असून, नागरीकांनी याकामी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्याधिकारी तानाजी दाते, आरोग्य निरिक्षक राजेंद्र उजीनवाल, क्षितीज रोकडे, संजय मानमोडे, वैभव घोळवे व डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन दादा धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठानचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.

या मोहिमेचा प्रारंभ कुदळवाडी येथील  उड्डाण पुलाजवळ झाला. त्यानंतर स्पाईनरोडने, वखार महामंडळ चौक परिसरात समारोप झाला तसेच भोसरी येथील उड्डाण पुलापासून सुरुवात करुन त्याचा समारोप पांजरपोळ येथे झाला.

या संपुर्ण मुख्य रस्त्यावरील ओला व सुका कचरा स्वयंसेवकांकडून संकलीत केला. त्यामध्ये ओला कचरा – 2.2 मेट्रीक टन., तर सुका कचरा 25.8 मेट्रीक टन यासाठी कॅपॅक्टर -1, ट्रक 8 व टाटा- – – एस – 7 या वाहनाद्वारे सदरच्या कच-याचे संकलन करण्यात आले.