स्किल्स ऑन व्हील्स बसचे श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज चिंबळी फाटा येथे प्रात्यक्षिक सादर

सोमवार दि. 27 फेब्रुवारी 2023 रोजी मल्टी स्किल फाउंडेशन कोर्सच्या अंतर्गत स्किल्स ऑन व्हील्स हि प्रशिक्षणासाठी लागणारी सर्व साधने यंत्रे व हत्यारे यांनी सुसज्ज असलली बस शाळेमध्ये आणण्यातआली होती.या बसमधील विविध साधनांचे प्रात्यक्षिक यावेळी मुलांना दाखविण्यात आले.या कोर्स अंतर्गत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना फॅब्रिकेशन, प्लंबिंग,इलेक्ट्रिक वायरिंग,फिटिंग माती परीक्षण, मायक्रो इरिगेशन अन्नप्रक्रिया आहार व स्वच्छता या जीवन उपयोगी कृतींसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्याचे ज्ञान मुलांना देण्यात आले. यावेळी ड्रिलिंग,कटिंग, इरिगेशन यांचे प्रात्यक्षिक मुलांनी स्वतः केले. मुलांनी स्वतः त्या बस मध्ये असलेली विविध साधने हाताळली व वापरली यामधून त्यांना खूप काही शिकण्यास मिळाले. मुलांना कार्यक्रमांतर्गत असलेल्या कौशल्य विषयक विषयाची माहिती देण्यात आली यावेळी संस्थेचे तुषार सर यांनी मुलांना बसमधे असलेले वेगवेगळे टूल्स दाखवले.या टूल्समध्ये कुकिंग टूल्स ,इंजीनियरिंग टूल्स,एग्रीकल्चर टूल्स तसेच मेकॅनिक्स साठी वापरले जाणारे साधने,आरोग्य विषयासाठी वापरली साधने अशा विविध प्रकारचे साधने त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दाखवले. व त्याची माहिती मुलांना दिली.
मुलांमध्ये कौशल्य वृत्ती व्हावी त्यांना आत्तापासूनच विविध कौशल्य आत्मसात करण्याची सवय लागावी यासाठी यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव गवारे सर , संस्थेच्या अध्यक्षा सौ. विद्याताई गवारे मॅडम,शाळेच्या प्राचार्य अनिता टिळेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली लेंड अ हॅन्ड इंडिया या संस्थेची स्किल ऑन व्हील्स ही बस शाळेच्या प्रांगणामध्ये आणण्यात आलेली होती. यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका तांबे मॅडम, मुंगसे मॅडम सपना मॅडम तसेच शाळेच्या विधाटे मॅडम,अनाप मॅडम, दिघे मॅडम पटले मॅडम,सोंडगे मॅडम, कानडे मॅडम या शिक्षिका तेथे उपस्थित होत्या. शिक्षकांनी सुद्धा या बस मध्ये असलेल्या विविध साधनांचे प्रात्यक्षिक केले.