“श्री समर्थ स्कूल ॲन्ड काॅलेज ,निघोजे येथे ढोलताशांच्या गजरात शिवजयंती धुमधडाक्यात साजरी”

सोमवार दि.२०फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून श्री समर्थ स्कूल ॲन्ड काॅलेज निघोजे येथे शिवजन्मसोहळा उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८वा.ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.शिवाजीराव गवारे सर आणि संस्थेच्या संस्थापिका मा. सौ.विद्याताई गवारे मॅडम ,अमोल गवारे (मुख्य शाखा अधिकारी) श्री.कैलासशेठ येळवंडे(सल्लागार पतसंस्था), श्री. संदीप शेठ येळवंडे(संचालक पतसंस्था), श्री. निलेश आंद्रे (युवा उद्योजक) सौ. शितलताई आशिष येळवंडे (सन्मार्ग फाउंडेशन),सौ.सुनिताताई दिनकर शिंदे (उपसरपंच महानगाव निघोजे), रूपालीताई येळवंडे, रिटाताई सोनवणे, नम्रताताई येळवंडे, अलकाताई पाडेकर, सुजाताताई फडके , नंदाताई येळवंडे, दत्तात्रेय आंद्रे (संचालक), दीपक कांबळे (युवा सेना तालुका संघटक), ह. भ. प .मोहन नामदेव शिंदे , उमेश येळवंडे,नंदाताई उमेश येळवंडे, सौ.अनिता टिळेकर (प्रिन्सिपल चिंबळी फाटा ), सौ. पल्लवी कुटे (प्रिन्सिपल निघोजे), सौ. विद्या पवार (प्रिन्सिपल खराबवाडी), सौ .वंदना यादव (प्रिन्सिपल खांलुब्रे), सौ . स्वाती सोनवणे (प्रिन्सिपल चाकण) श्री समर्थ पतसंस्थेचे कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुलताना पठाण मॅडम यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम ,ढोल पथक ,नृत्य, नाटक इत्यादी कला सादर केल्या .शिवजयंती निमित्त शिवव्याख्याते ह .भ .प. चैतन्य महाराज घोलप यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून अनेक युद्धे जिंकली तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक आयुष्यामध्ये ‘गनिमी कावा’ या गुणाचा वापर करून आपल्या शैक्षणिक व आर्थिक विकास कसा होईल याकडे लक्ष द्यावे असे बहुमोलाचे मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव गवारे सर आणि विद्याताई गवारे मॅडम यांनी मुलांना कौतुकाची थाप दिली. श्री. अक्षय शेठ कैलास येळवंडे (शिवव्याख्याते) यांनी शिवगर्जना करून कार्यक्रमाची सांगता केली.