17 फेब्रुवारी २०२३, रोजी शिवजयंती सोहळ्याचे औचीत्त्य साधून श्री. समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल , खालुंब्रे चा सोहळा उत्साहात संप्पन्न

दि. 17 फेब्रुवारी २०२३, रोजी शिवजयंती सोहळ्याचे औचीत्त्य साधून श्री. समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल , खालुंब्रे चा सोहळा उत्साहात संप्पन्न झाला. यावेळी अश्विनी देवकर मॅडम, नंदा पवार मॅडम व संदिप पवार सर, गोविंद गवारे (व्यवस्थापक श्री समर्थ पत संस्था), दत्तात्रयशेठ बोत्रे, नितीन शेठ बोत्रे, सुप्रियाताई बोत्रे ( संचालिका श्री समर्थ पतसंस्था)उद्योजक भानुदास कावरे उपस्थित होते. व सौ शीतल कावरे यांनी राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारली होती..सौ. वंदना यादव ( मुख्याध्यापिका) खालुंब्रे ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , पालक आणि विध्यार्थी आवर्जून उपस्थित होते. यावेळी विध्यार्थ्यानी लेझीम, नृत्य, नाटक, इ. कला सादर केल्या. प्रेरणा मॅडम व प्रतिभा मॅडम यांनी खूप छान सूत्रसंचालन केले. तसेच संस्थेचे चेअरमन शिवाजी गवारे सर व सौ विद्या ताई गवारे मैडम यांनी मुलांना कौतुकाची थाप दिली.. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाचपुते यांनी विध्यार्थ्यांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता केली.