सहावीपासून जेईई अभ्यासक्रम : वारे वाभळेवाडी शाळेसाठी लोकसहभागातून दरवर्षी १५ लाखांची निधी

शिक्षक व गावकरी एक झाल्यास काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाभळेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथील जिल्हा परिषदेची शाळा होय. येथे अंगणवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेला जोडली आहे. सहावीच्या वर्गापासून विद्याथ्र्यांना ‘जेईई’ चे शिक्षण दिले जाते. शाळेला दरवर्षी १५ लाख रुपयांची लोकवर्गणी मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक दत्ता बारे यांनी केले.

आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बाभळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेतील मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले, त्या वेळी श्री. वारे बोलत होते. या वेळी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, उपशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, वाभळेवाडीचे सतीश वाभळे, गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार, मल्हारी बनसोडे, मास्ती फडके, विस्ताराधिकारी गोदावरी राठोड, स्वाती स्वामी, जयश्री सुतार उपस्थित होते.श्री. चारे म्हणाले, शिक्षक व विद्यार्थी या दोघांनीही मिळूनशिकायला हवे. शाळेत शिक्षक २० टक्के शिकवितात पण मुले ८० टक्के शिकत असतात. शिक्षक व मुलांचे नाते कसे आहे, यावर तो मुलगा शिकतो की नाही हे निश्चित होते. त्यामुळे शिक्षकांनी विद्याथ्र्यांशी चांगले नाते निर्माण करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे . शिक्षकांशी सगळ्यात जवळचे नाते निर्माण झाल्यास तो विद्यार्थी निश्चितच चांगला शिकतो. गावातील अंगणवाडी दर्जेदार करून तो जिल्हा परिषदेच्या शाळेला जोडायला हवी, असेही श्री. वारे यांनी सांगितले. मुलांना बाहेरच्या जगापेक्षा शाळा सुरळीत वाटली तर निश्चितच त्या शाळेत विद्यार्थी शिकतात. २००० ला या शाळेचा पट ३२ होता, तो २०१९ मध्ये ६००इतका झाला आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी चार हजार विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. गावातील यात्रा, हरिनाम सप्ताह, तमाशा हे सर्व बंद करण्यात आले आहे. गावकरी शाळेला दरवर्षी १५ लाख रुपये देतात. गावातील दोन महिला बचत गट वर्षांचा फायदा शाळेला देतात. शाळेतून आंतरराष्ट्रीयदर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे श्री. वारे यांनी सांगितले. शाळा कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी घेत नाही. त्या शाळेतील विद्यार्थी रोबोट बनवितात. या गावात ७० घरे तर ४५० लोकसंख्या असल्याचे सांगण्यासही श्री. वारे विसरले नाही..