प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या शुभहस्ते नारायण करपे लिखीत धमाल बालनाट्य पुस्तकाचे प्रकाशन.

यशवंतराव चव्हाण आंतर शालेय नाट्य स्पर्धा पुणे 2023
नाट्य स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम पुणे लोकशाहीर आण्णा भाऊसाठे नाट्यगृह येरवडा येथे पार पडला. यावेळी श्री नारायण करपे लिखित संस्कारक्षम धमाल बालनाट्य या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे ,पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी आयुष प्रसाद साहेब , शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, पुणे डायटच्या प्राचार्य शोभा खंदारे ,वरिष्ठ अधिव्याख्याता बाळकृष्ण वाटेकर, नाट्य समितीचे कार्याध्यक्ष हनुमंत कुबडे सर, ज्येष्ठ रंगकर्मी बाबा भुतकर सर, समन्वयक प्रकाश खोत सर ,संजीव मांढरे सर, प्रमोद काकडे सर, यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला.यावेळी रवींद्र सातपुते सर,किशोर भगत सर , सुधीर कदम सर,नामदेव पडदुणे सर, प्रमोद पारधी सर, विलास गुंजाळ सर, तसेच गीता पाटील, स्मिता पवार मॅडम, कल्पना शेरे मॅडम
तसेच जिल्ह्यातील अनेक शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक नाट्यकलाकार विध्यार्थी नाट्यदिग्दर्शक ,नाट्य लेखक आणि नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.