जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विदयापिठची डि.लिट. पदवी सचिनदादा धर्माधिकारी यांना जाहीर

जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विदयापिठाच्या वतीने डि.लिट. पदवी सामाजिक कार्यातील योगदाना बद्दल श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आली. विदयापिठाचे कुलपती डॉ. श्री. विनोदजी टीब्रेवाल यांचे पत्र विदयापिठाच्या शैक्षणिक संचालक डॉ. वनश्री वालेचा यांनी श्री. सचिनदादा यांना दिले. या पुर्वी विदयापिठाने माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, अभिनेत्री हेमामालिनी, श्री. भगतसिंग कोश्यारी, डॉ. डि. वाय. पाटील, जनरल जोगींदर जसविंदरसिंग, डॉ. कमला बेनिवाल, डॉ. एस. सी. जमीर, श्री. बनवारीलाल जोशी, श्रीकेशरीनाथ त्रिपाठी सहीत विस राज्यपाल असे अनेक मान्यवरांना गौरवण्यात आले आहे.

श्री. सचिनदादा धर्माधिकारी हे गेली अनेक वर्षे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक समाजाभिमुख उपक्रम राबविणारे प्रतिष्ठान आहे. हे प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड येथून कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकी आणि समाज ऋणांची जाणीव ठेवून हे प्रतिष्ठान सातत्याने अनेक समाजोपयोगी उपक्रम साकारत आलेले आहे. यातील प्रमुख प्रकल्प असे आहेत, वृक्षारोपण आणि संगोपन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वाटप, रक्तदान शिबीरे, निःशुल्क आरोग्य निदान आणि उपचार, आरोग्य विषयक जनजागृती शिबीरे. पाणपोयांची निर्मिती, बस थांब्यांवर निवाऱ्यांची निर्मिती, कालवे, सरोवरे, नद्या आणि धरणांमधील गाळांचा उपसा करणे, स्पर्धा परीक्षा आणि व्यवसायांसाठी मार्गदर्शन शिबीरे, दुर्घटनाग्रस्त व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, शारीरिकदृष्टया अक्षम आणि मुक-बधीर व्यक्तींना आवश्यक अवयव आणि उपकरणांचे वाटप हे होय. या पुर्वी श्री. सचिनदादा यांना युरोपियन इंटरनॅशनल विदयापिठ, फ्रांस ची डि. लिट. पदवी सहित अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.