“श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज चिंबळी फाटा येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा”.

गुरुवार ,दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज,चिंबळी फाटा येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला .शाळेत कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेसात वाजता प्रभात फेरी काढून करण्यात आली. शाळेतील सर्व मुलांनी प्रभात फेरीच्या वेळी विविध घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून टाकला .सर्वप्रथम श्री समर्थ पतसंस्था चिंबळी फाटा येथे व त्यानंतर शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय श्री. शिवाजीराव गवारे सर आणि संस्थेच्या संस्थापिका माननीय सौ. विद्याताई गवारे मॅडम पतसंस्थेचे खजिनदार संतोष शेठ गवारे संचालिका नंदाताई येळवंडे तसेच संस्थेचे सल्लागार ज्ञानेश्वर ठाकूर सर सोळू शाखेचे व्यवस्थापक श्री. प्रदीप लांडगे सर हे उपस्थित होते .पतसंस्थेचे ध्वजारोहण माननीय श्री. ज्ञानेश्वर भाऊ ठाकूर सर व माननीय उमेश येळवंडे सर याच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या माननीय सौ अनिता टिळेकर मॅडम,केळगाव शाखेच्य रूपाली पवळे मॅडम,, सुनीता नाटक मॅडम, विकास पवळे सर, रूपाली पवळे मॅडम, पतसंस्थेचे व्यवस्थापक अमोल गवारे सर , अर्जुन जाधव सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्षपद शेखर कृष्णाजी करपे सर यांनी भूषविले, तसेच कार्यक्रमाच्या वेळी पर्यवेक्षिका तांबे मॅडम, मुंगसे मॅडम, सपना मॅडम दिपाली थोरात मॅडम तसेच सांस्कृतिक विभागाचे दिघे वर्षा, सुरज सोमवंशी,बडदे ललिता, मीनाक्षी पाटील,योगिता पाटील,स्मिता नलगे,डोंगरे नीलम,संतोष गवारे ,निखिल कांबळे इ शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा जाधव मॅडम, धावारे मॅडम यांनी केले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत ,ध्वजगीत ,ध्वज प्रतिज्ञा ,संविधान सरनामा वाचन व स्वागत गीत सादर केले. यावेळी स्काऊट गाईड, आर एस पी च्या विद्यार्थ्यांनी परेडच्या माध्यमातून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली व देशाप्रती आपले प्रेम व्यक्त केले. त्यानंतर आरएसएस च्या विद्यार्थ्यांनी आरएसएस घोष ,वंशी वादन ,गणसमता यांचे सादरीकरण करून आपले देशप्रेम व्यक्त केले. त्यानंतर कवायत प्रकार-डंबेल्स, घुंगुर काठी ,लेझीम यांचे अतीशय मनमोहक रीतीने विद्यार्थांनी सादरिकरण केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषनाच्या द्वारे आपले मनोगत व्यक्त केले. केळगाव शाखेच्या विद्यार्थ्यांनी पिरामिड सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रम इयत्ता सातवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी पार पाडला. तसेच इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पथनाट्यातून संविधानाचे मूलभूत अधिकार व कर्तव्य यांचे महत्त्व सर्वांना पटवून दिले यानंतर शिक्षक मनोगतामध्ये पवार सर व जोशना बर्गे मॅडम यांनी कवितेच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अध्यक्षीय भाषण माननीय शेखर कृष्णाजी करपे सर यांनी केले. त्यातून त्यांनी मुलांना वास्तविक जीवनाचे महत्त्व तसेच सांस्कृतिक मूल्यांची जाणीव करून दिली. आपल्या विद्यालयाच्या प्राचार्या सौ. अनिता टिळेकर मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ या गीताने झाली .शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.