“श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज निघोजे येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा “

गुरुवार दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज निघोजे येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिनाचा  कार्यक्रम पार पाडण्यात आला .शाळेत कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७. ३० वाजता प्रभातफेरी करून करण्यात आली. शाळेतल्या सर्व मुलांनी प्रभातफेरीच्या वेळी विविध घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून टाकला . सर्वप्रथम शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला .यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री शिवाजीराव गवारे सर आणि संस्थेच्या संस्थापिका मा. सौ विद्याताई गवारे मॅडम , सौ . पल्लवी कुटे (प्राचार्य निघोजे), पतसंस्थेचे सचिव श्री. साकारे सर व त्यांचे सहकारी कर्मचारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.संदीप येळवंडे , ,सौ. शितलताई आशिष येळवंडे (अध्यक्ष सन्मार्ग फाऊंडेशन ), पतसंस्थेचे चेअरमन मा . श्री. कैलास येळवंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सौ. जयश्री तुपे मॅडम यांनी केले .ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत ,ध्वजगीत ,ध्वजप्रतिज्ञा व स्वागतगीत सादर केले .त्यानंतर कवायत प्रकार -डंबेल्स ,लेझीम यांचे अतिशय मनमोहक रीतीने विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले .

विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणाच्या द्वारे आपले मनोगत व्यक्त केले .सांस्कृतिक कार्यक्रम इयत्ता ५वी ,६वी,७वी च्या विद्यार्थ्यांनी पार पाडला .लहान गटातील विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून सर्वधर्मसमभावहा संदेश सर्वाना पटवून दिला. त्यानंतर अध्यक्षीय भाषण मा. श्री. दीपक कांबळे सर यांनी केले .त्यातून त्यांनी मुलांना सांस्कृतिक मूल्याची जाणीव करून दिली . शाळेच्या प्राचार्या सौ . पल्लवी कुटे  मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.त्यानंतर कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ या गीताने व सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून  झाली.